माझ्याबद्दल काही तरी.....

माझे नाव भाग्यश्री. मी गुजरातची राहणारी, चार चौघांसारखे सामान्य आयुष्य जगते, पण जीवनात काही तरी वेगळे करण्याची इच्छा आहे. मला दुसऱ्यांना मदत करायला खूप आवडते. आपल्याला जर समाजाने त्याचा एक भाग म्हणून स्वीकारले आहे तर आपण ही समाजाला काही तरी देणे लागतो, असं माझं मत आहे. मला गाणी ऐकणे, वाचन, गप्पा मारणे, मित्र-मैत्रिणींबरोबर फिरणे असे बरेच छंद आहेत. मला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा मी माझे हे छंद जोपासते. अरे हो..........!!! महत्वाचं राहिलं मला लेखनाचीसुद्धा आवड आहे बर कां............म्हणूनच मी हा ब्लॉग सुरु केला आहे आणि तसं ही ह्या technology च्या युगात diary लिहिणे थोडं outdated वाटते नाही कां? तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा ब्लॉग वाचत आहात त्या बद्दल आभार.

किस हद तक जीना है ये कौन जानता है,
किस मंजिल को पाना है ये कौन जानता है,
जिंदगी हर पल जी भर के जियो,
किस रोज़ बिछड़ना है ये कौन जानता है!!!!!!!!!!