Thursday, June 2, 2011

सुख - खरचं पैश्यात मोजता येतं?

प्रत्येक माणसाच्या सुखाच्या व्याख्या किती वेगवेगळ्या आहेत , नाही ? कोणाला भरपूर पैसा कमावणं ह्यात सुख मिळतं, तर कोणाला एकतरी दिवस आपल्या कुटुंबाबरोबर सुखाने घालवण्यात आनंद मिळतो , कोणाला पैशाने दुसऱ्यांना मदत करायला आवडतं तर कोणाला स्व जातीने दुसऱ्यांची सेवा करण्यात आनंद मिळतो . थोडक्यात काय तर सुखाची व्याख्या देणं खरचं कठीण ......... जसं सुख अनुभवण्यात मजा आहे तसचं सुख बघण्यातही आनंद आहे ... तुम्ही कधी railway track  च्या बाजूच्या झोपडीत राहणाऱ्या मुलांना तिथेच खेळताना पाहिले आहे , किती मस्त खेळत असतात ती !!!! संध्याकाळी हॉटेल मध्ये सतत काम करणारे दिवसा तिथेच क्रिकेट  खेळत असतात आणि बाकीचे त्यांना प्रोत्साहन देत असतात , जणू काही stadium च ते . platform  वर भीक मागणारे रात्री तिथेच किती गाढ झोपले असतात . एकदा आमची गाडी highway  वर traffic  मध्ये अडकली , पुढे एक accident  झाला होता त्यामुळे तास दोनतास तरी निश्चिंती होती . आम्ही सगळे घामाने लथपथ आणि traffic clear होण्याची वाट बघत होतो , पण बाजूच्या गाडीचा driver मस्तपैकी झोपला होता . त्याला त्या गर्मीत किती गाढ झोप लागली होती. माझ्या आजीच्या घरी रोज एक भाजीवाली येते . भर दुपारी आल्यावर जेव्हा मी तिला थंड पाणी दिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळचं समाधान दिसलं. ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद , सुख बघितल्यावर असा विचार येतो ,'सुख खरचं पैश्यात मोजता येतं?' तसेच सुखाच्या सगळ्या वस्तू विकत घेता येतात पण सुख नाही हे पण पटलं.....

2 comments: